Marathwada Sathi

प्रा.रविंद्र आचार्य यांना पीएचडी पदवी प्रदान

अंबाजोगाई

येथील प्रा.रविंद्र दत्ताञय आचार्य यांना रसायनशास्त्र विषयांत सखोल व गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी मान्यवरांचे हस्ते डॉक्टरेट (पीएचडी पदवी) नुकतीच प्रदान करण्यात आली.योगेश्वरी महाविद्यालय,अंबाजोगाई येथे सध्या सी.एस.बी.तत्वावर रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा.रविंद्र आचार्य यांनी राजस्थान सरकारच्या जे.जे.टी.विश्वविद्यापीठात रसायनशास्ञा मध्ये “रिसर्च इन पोझिशन ऑफ वॉटर,सुपरस्पेशालिटी इन हेल्दी वॉटर इन अँड अराऊंड अंबाजोगाई जिल्हा बीड,महाराष्ट्र स्टेट” या विषयात डाॅ.अमोल पाचपिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल संशोधन करून आपला शोधप्रबंध सादर केला.रसायनशास्त्र विषयांत सखोल व गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी आचार्य यांना गुजरातचे गव्हर्नर देवव्रत आचार्य,ज्येष्ठ वैज्ञानिक राकेश तिवारी आणि ब्रिगेडीयर सुरजितसिंग साबला यांच्या हस्ते नुकतीच डॉक्टरेट (पीएचडी पदवी) प्रदान करण्यात आली आहे.प्रा.आचार्य यांनी प्राथमिक शिक्षण हे नेताजी सुभाषचंद्र विद्यालय,अंबाजोगाई,माध्यमिक शिक्षण योगेश्वरी विद्यालय तसेच एम.एसस्सी योगेश्वरी महाविद्यालय,अंबाजोगाई आणि बी.एड.शासकीय महाविद्यालय,अंबाजोगाई येथे पूर्ण केले.शिक्षण पूर्ण झाल्यावर आचार्य यांनी वसुंधरा महाविद्यालय,लाडेगाव,जोधाप्रसादजी मोदी अध्यापक विद्यालय,अंबाजोगाई आणि नागेश्वर विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक अध्यापनाचे कार्य केले आहे.प्रा.रविंद्र हे अंबाजोगाईतील सामाजिक कार्यकर्ते, नाट्यकलावंत दत्ताञय आचार्य यांचे सुपुत्र आहेत.प्रा.रविंद्र आचार्य यांच्या यशाचे कौतुक करून प्राचार्य डॉ.आर.डी.जोशी,उपप्राचार्य डॉ.कुलकर्णी, संगणक विभागप्रमुख डॉ.राजेश जोशी, डॉ.थेटे,डॉ.महेंद्र आचार्य,प्रा.संजय कुलकर्णी,डॉ.जाधव,रसायनशास्ञ विभागप्रमुख डॉ.व्हि.आर.चौधरी, डॉ. राहुल धाकडे, प्राचार्य मधुकर खळगे,चौधरी दादा,मधू शिनगारे,बालासाहेब सोनवणे, पञकार संतोष बोबडे, राजू साळवी,कदम सर,रोडे सर यांचेसह मित्र आणि परिवारातून प्रा.रविंद्र आचार्य यांचे अभिनंदन होत आहे़.

Exit mobile version