Marathwada Sathi

प्रा.बाबासाहेब सातपुते यांना पीएचडी पदवी प्रदान

अंबाजोगाई येथील सुपूञ प्रा.बाबासाहेब संभाजीराव सातपुते यांना अभियांत्रिकी विषयांत सखोल व गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी डॉक्टरेट (पीएचडी पदवी) नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.

सध्या डॉ.डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,पिंपरी (पुणे) येथे संगणक विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा.बाबासाहेब संभाजीराव सातपुते यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरींग मध्ये “मशिन लर्निंग” या विषयात डाॅ.राघव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल संशोधन केले.सॅम हायजिनिंगबॉटम युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस,अलाहाबाद येथे आपला शोध प्रबंध सादर केला.अभियांत्रिकी विषयांत सखोल व गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी डॉक्टरेट (पीएचडी पदवी) नुकतीच प्रदान
करण्यात आली आहे.आपल्या यशाचे श्रेय प्रा.बाबासाहेब संभाजीराव सातपुते यांनी मार्गदर्शक डाॅ.राघव यादव,आई सौ.ञिवेणी,वडील संभाजीराव,पत्नी मनिषा आणि सर्व हितचिंतकांना दिले आहे.प्रा.बाबासाहेब सातपुते हे मुंबई विद्यापीठातून बी.ई.पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून एम.टेक ट्रिपल आय.टी अलाहाबाद विद्यापीठ (उत्तरप्रदेश) येथून उत्तीर्ण झाले आहेत.तसेच त्यांच्या पत्नी मनिषा याही बी.टेक आहेत.प्रा. बाबासाहेब हे अंबाजोगाईतील सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव सातपुते यांचे सुपुत्र आहेत.प्रा. बाबासाहेब सातपुते यांच्या यशाचे कौतुक करून प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, अॅड.अनंतराव जगतकर,अॅड.किशोर गिरवलकर,माजी शिक्षणाधिकारी व्यंकटराव नेटके, अभियंते एन.डी.शिंदे, प्रा.एस के जोगदंड, अभियंते शामराव सोळुंके,पत्रकार दिनकर जोशी,अॅड. शिवाजी कांबळे, प्रभाकर वाघमारे, अॅड.सुनील सौंदरमल,लिंबाजी खरटमोल,प्रा.डी.जी.धाकडे,भगवानराव ढगे,के.जी.कांबळे,
अभियंते शेवाळे, प्रा.डि.जी.झरीकर,सटवाजी सातपुते,घुले सर,भाऊसाहेब गिराम,व्ही.एम.कांबळे यांचेसह मित्र आणि परिवारातून अभिनंदन होत आहे़.

Exit mobile version