Home औरंगाबाद औरंगाबादेत चोरटयांनी चक्क एटीएम मशीनचं उखडून नेले

औरंगाबादेत चोरटयांनी चक्क एटीएम मशीनचं उखडून नेले

330
0

मराठवाडा साथी टीम

औरंगाबाद : शहर व ग्रामीण भागात चोरी, लूटमार व दरोड्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. चोरांचा धुमाकूळ रोखण्यात पोलिस प्रशासनाला अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. घरफोडी नंतर चोरांनी आता एटीएम मशीनला टार्गेट केले आहे. एटीएम मधील रोकड लुटण्यासाठी आलेल्या चोरांना मशीन फोडता न आल्याने त्यांनी मशीनचा उखडून पोबारा केला. ही खळबळजनक घटना औरंगाबाद-पैठण रोडवरील ढोरकीन गावात घडली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

ढोरकीन गावातील बाजारपेठेत इंडिया बँकेचं एटीएम सेंटर आहे. गुरुवारी दुपारी या एटीएममध्ये रोकड भरण्यात आली होती. मध्यरात्री चोरांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला मात्र, मशीन फुटत नसल्याचे पाहून चोरटयांनी चक्क पूर्ण मशीन उखडून सोबत नेले. या प्रकारामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरांचा माग काढण्यासाठी पोलिस पथकासह फॉरेन्सिक, डॉग स्कॉड, घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरट्यानी एटीएम मशीन चारचाकी गाडीतून नेले असावे असा पोलिसांचा कयास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here