Home इतर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुक लांबवण्याची शक्यता; कोर्टाने दिली स्थगिती

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुक लांबवण्याची शक्यता; कोर्टाने दिली स्थगिती

215
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक परत एकदा लांबवण्याची शक्यता आहे . कोरोनामुळे सुप्रीम कोर्टची स्थगिती आल्यानंतर आता जनगणना घोषित झाली आहे. तर पुन्हा रचनेसाठी महापालिका निवडणुकीला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून सहा महिने झाले. मात्र, जनगणना घोषित झाली तर औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक पुन्हा स्थगित होण्याची भीती आहे.मार्च महिन्यात आलेल्या कोरोना सारख्या महामारी रोगामुळे राज्यभरातील निवडणुकांना स्थगिती मिळाल्यामुळे महानगरपालिका इलेक्शनलाही ब्रेक लागला होता. नंतर औरंगाबादमधील प्रभाग रचनेवरील आक्षेप याचीकेमुळे सुप्रीम कोर्टने स्थगिती दिली होती.जनगणना घोषित झाली तर पुन्हा रचनेसाठी स्थगिती मिळू शकते.

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीचे वाद आणि स्थगिती यांत समीकरण होताना दिसत आहे .औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये गेल्या वेळी औरंगाबाद मध्ये ११५ वॉर्ड ची रचना होती. त्यावेळी लोकसंख्या सरासरी १० हजार एवढी होती . आता सातारा ते देवळाई परिसर हा महानगरपालिकेत समाविष्ट झाला आहे या परिसरातील लोकसंख्या सरासरी ५० हजारापेक्षाहि जास्त आहे त्यामुळे नवीन जनगणनेनुसार १२५ वॉर्डचे सगळी रचना नव्याने तयार करावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here