Home मनोरंजन चित्रपटावर बहिष्कार घालण्याची प्रेक्षकांकडून धमकी…!

चित्रपटावर बहिष्कार घालण्याची प्रेक्षकांकडून धमकी…!

88
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटीज च्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.अभिनेत्री कंगना रानौतने सुद्धा तिच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते.पार्टी मध्ये कंगनाच्या आगामी ‘धाकड़’ चित्रपटाचे दिग्दर्शक रेजी घई,अर्जुन रामपाल आणि अर्जुनची गर्लफ्रेंड ग्रैबिए उपस्थित होते.या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ कंगनाने सोशल मिडियावर शेअर केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.कारण दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन समोर आले.या ड्रग्ज प्रकरणात नाव आलेल्या बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांवर कंगनाने सोशल मिडियावर टिका देखील केली होती. मात्र,आता कंगनाचा अर्जुन रामपालसोबतचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान,कंगनाला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.काही म्हणताय कंगनाच्या या चित्रपटावर बहिष्कार घालायचा,तर काही अर्जुन रामपाल तुमच्यासोबत काय करत आहे?,ड्रग्स प्रकरणावर तुम्ही बरीच मते मांडतात आणि तुम्ही ज्यांच्यासोबत पार्टी करत आहात त्यांची चौकशी सुरू आहे आणि तुमची हिम्मत कशी झाली अशा मानसासोबत पार्टी करण्याची आणि फोटो काढण्याची इत्यादी असे प्रश्न करीत कंगनाला ट्रोल करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here