Home नाशिक विंचूर उपबाजार समितीत कांद्यांचा लिलाव सुरु, नाशकात तिढा कायम

विंचूर उपबाजार समितीत कांद्यांचा लिलाव सुरु, नाशकात तिढा कायम

389
0

नाशिक : केंद्र सरकारने कांदा खरेदीवर निर्बंध आणल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत. मात्र, बुधवारी लासलगावची उपबाजार समिती विंचूर उपबाजार परिसरात कांदा लिलाव सुरू करण्यात आला. येथे सध्या कांद्याला चार हजार आठशे रुपये भाव मिळतोय. विंचूर वगळता इतर बाजार समित्यांमधील कांदा लिलावाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. यासंदर्भात सहकार विभागाचे अधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांमध्ये बैठक झाली. बैठकीत लवकरात लवकर कांदा लिलाव सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.
१०,८०० शेतकऱ्यांना वसुलीची नोटीस
नाशिक जिल्ह्यात १० हजार आठशे शेतकऱ्यांना वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधान किसान योजनेत अनुदान लाटल्याचे उघड झाल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. आयकर भरत असतांना प्रत्येकी ६००० रुपये अनुदान घेतल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. सर्वाधिक शेतकरी जिल्ह्यातील मालेगाव, येवला आणि चांदवडचे आहेत. आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत हे शेतकरी आहेत. पैसे परत न केल्यास कारवाई होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here