Marathwada Sathi

ऑफिस मध्ये घुसून ‘आत्महत्या’ करण्याचा प्रयत्न…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : पुण्यामधील धनकवडी येथील नामंकित ईशा ग्रुप संस्था मध्ये आर्थिक वादातून ऑफिसमध्ये घुसून ऑफिसची तोडफोड करत आग लावून दिली.स्वतः ऑफिसमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भरत नागोरी (वय ६१, रा.धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हसमुख बाबूलाल जैन, राहणार, गुलटेकडी, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हा व्यापारी आहेत. त्यांचे शंकर महाराज मठाशेजारी ऑफिस आहे. दरम्यान २००६ मध्ये आरोपी जैन, फिर्यादी व इतरांनी ईशा ग्रुप नावाने भागीदारीत संस्था स्थापन केली होती. त्यात फिर्यादी नागोरी, जैन व स्वर्णसिंग सोहेल हे २०१४ पर्यंत संचालक होते. त्यानंतर जैन याने ईशा संस्थेच्या अंतर्गत असलेल्या ईशा स्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीचा राजीनामा दिला होता. मात्र यानंतर या कंपनीच्या भागीदारामध्ये न्यायालयात अनेक दावे सुरू आहेत. जैन यांच्यात आर्थिक व इतर गोष्टीसाठी वाद सुरू आहेत. गुरुवारी (दि.२४ डिसेंबर) दुपारी जैन हा फिर्यादी यांच्या धनकवडी येथील ऑफिसमध्ये गेला. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत ऑफिसमधून बाहेर काढले व आतून ऑफिस लावून घेतले. तसेच ऑफिसची तोडफोड केली. त्यानंतर त्याला आग लावून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांना माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे .

Exit mobile version