Home गंगाखेड अ‍ॅटोचा अपघात घडवत पत्नीचा केला खून; पतीस अटक

अ‍ॅटोचा अपघात घडवत पत्नीचा केला खून; पतीस अटक

42
0

गंगाखेड : भावाला घरी का येऊ दिलेस’, या कारणातून अ‍ॅटोचालक असलेल्या पतीने गुरुवारी दि.19 रात्री गंगाखेड तालुक्यातील चौधरीच्या माळरानावर अ‍ॅटो जाणीवपूर्वक पलटी करून पत्नीचा खून केला या प्रकरणी भाऊ सिद्धेश्वर तिडके याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात पती परमेश्वर कातकडे याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील सौ.कौशल्या यांचा उडेगांव येथील अ‍ॅटोचालक असलेल्या परमेश्वर मंचक कातकडे याच्यासोबत झाला होता.या दाम्पत्याला दोन मुले आहेत. दिवाळीला बहिण गावी न आल्याने भाऊ सिद्धेश्वर लक्ष्मण तिडके रा. डोंगरपिंपळा हे गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उंडेगाव येथे पत्नीसह बहिण कौशल्या हिच्या घरी आले होते.मात्र हीच बाब कौशल्या हिचा पती परमेश्वर याला खटकली. त्याने रात्री घरी आल्यानंतर तू तुझ्या भावास घरात का घेतलेस’ असे म्हणून पत्नीस मारहाण केली. त्याचबरोबर सिध्देश्वर यास फोन करून तुझ्या बहिणीला आता खतम करतो अशी धमकीही दिली. पतीकडून मारहाणीसह शिविगाळ होत असल्याने कौशल्या हिने ही बाब भावास फोन करून सांगितली. तसेच उंडेगाव येथे तातडीने ये म्हणूनही म्हटले. मात्र, अ‍ॅटोचालक परमेश्वर याने आपल्या अ‍ॅटोमध्ये क्र. एमएच 22 एच 2104 पत्नीस बसवून अ‍ॅटो भरधाव चालवला. उंडेगाव येथून निघून कोद्रीकडे तो जात असताना रस्त्यातील चौधरीच्या माळराणावर सायंकाळी आठच्या सुमारास अ‍ॅटो भरधाव नेताना पलटी केला. भरधाव वेगात असलेल्या अ‍ॅटोतून कौशल्या ही पडली व जागीच मृत्यू पावली.या प्रकरणी कौशल्या हिचा भाऊ सिद्धेश्वर लक्ष्मण तिडके याने गंगाखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यात परमेश्वर कातकडे याने जाणीवपूर्वक अ‍ॅटोचा अपघात घडवत बहिणीला ठार मारल्याचे म्हटले.यावरून गंगाखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर करित आहेत.पती परमेश्वर कातकडे यास अ्टक केली आहे. घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी भेट देत पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here