Home क्रीडा त्यावेळी आम्हाला मैदान सोडायला सांगण्यात आलं होत ……..

त्यावेळी आम्हाला मैदान सोडायला सांगण्यात आलं होत ……..

127
0

IND vs AUS : भारताने गाबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळविला होता. यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला गेला. भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासोबतच कर्णधार अजिंक्य रहाणे ने सिडनी टेस्टमध्ये घेतलेल्या भूमिकेमुळेही त्याचं कौतुक होत आहे. सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली, यानंतर लगेचच अजिंक्य रहाणेने ऍक्शन घेतली.

सिडनी टेस्टमध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह बाबत वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली. यानंतर भारतीय टीमने याबाबत तक्रारही दाखल केली. रहाणेने स्पोर्ट्स टुडेशी बोलताना याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सिडनीतल्या वर्णद्वेषी टिप्पणीनंतर आपल्याला मैदान सोडून जाण्याबाबतही सांगण्यात आलं होतं, असं सांगितलं आहे.’सिडनीमध्ये सिराज आणि बाकी काही खेळाडूंसोबत ज्या गोष्टी झाल्या त्या निराशाजनक होत्या. आम्ही कडक पावलं उचलली. आम्हाला मैदानाबाहेर जायचा पर्यायही देण्यात आला होता, पण आम्ही तसं केलं नाही, कारण आम्ही तिकडे खेळण्यासाठी गेलो होतो. आम्ही आमच्या खेळाडूंचा सन्मान करतो आणि नेहमीच त्यांच्यासोबत असू,’ अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली.’मी सिराजसाठी खुश आहे. वडिलांच्या मृत्यूनंतरही तो खंबीर होता. त्याला टीमसोबत राहायचं होतं. नेटमध्येही तो खूप मेहनत करत होता. ऑस्ट्रेलियात त्याला जे यश मिळालं, त्याचं श्रेय सिराजचंच आहे,’ असं वक्तव्य रहाणेने केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here