Marathwada Sathi

त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त….

ऋषभ पंत ची प्रतिक्रिया

ऋषभ पंतवर सध्या चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय.त्याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील त्याची विजयी खेळी. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचविनिंग खेळीनंतर त्याची क्रिकेटमधल्या दिग्ग्जांबरोबरही तुलना सुरु झाली आहे. १९८८ नंतर प्रथमच गाबाच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला.

ऑस्ट्रेलियातील या कामगिरीबद्दल स्पोटर्स टुडेवर बोरीया मुजुमदार यांच्याशी बोलताना पंत म्हणाला की, “धावांचा पाठलाग करण्याला माझी पसंती असते. सामना ड्रॉ करण्याला कधीही माझे प्राधान्य नसते.” “सामना जिंकण्याचा प्रयत्न करा, हीच संघ व्यवस्थापनाची सुरुवातीपासूनची योजना होती. मी देखील सामना जिंकायचाच विचार करतो. मला प्रत्येक सामन्यात जिंकायचा असतो. त्या दृष्टीनेच मी खेळ खेळतो, सामना ड्रॉ करणं हा दुसरा पर्याय असतो” असे पंत म्हणाला.

Exit mobile version