Home क्राइम नोकरी गेल्यानंतर त्या जागेवर….

नोकरी गेल्यानंतर त्या जागेवर….

85
0


मराठवाडा साथी
नागपूर : नोकरी गेल्यानंतर त्या जागेवर नोकरीला लागलेल्या एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पारशिवनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अक्षय गंगाधर डोनारकर (वय,२२) असे या प्रकरणातील मृतकाचे नाव आहे. सागर कृष्णा बगमारे, निखिल यादवराव बगमारे, प्रवीण यादव बगमारे, सुमित कृष्णा बगमारे, मनोज अशोक पल्लेवार, विक्की हेमराज राऊत, अक्षय विजय बगमारे आणि कपील नारायण अशी आरोपींची नावे आहेत. अक्षयने आत्महत्या केल्याचे १३ मार्च २०२० रोजी नवेगाव खैरी येथे समोर आली आहे.


प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केल्याचा शेरा देत पारशिवनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अक्षयच्या पालकांचा त्यावर विश्वास नव्हता. अक्षय नवोदय विद्यालयात ‘ऑफिस बॉय’ म्हणून कामाला होता. त्यापूर्वी आरोपी सागर तेथे कामाला होता. काही महिन्यांपूर्वी सागरने ते काम सोडले होते. पुढे अक्षयला तेथे नोकरी लागली. त्यामुळे सागर हा अक्षयचा राग करीत असे. त्याने इतर आरोपींच्या मदतीने अक्षयचा खून केला, असा आरोप करणारी एक याचिका अक्षयच्या पालकांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केली. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पारशिवनी पोलिसांना दिले. या आदेशांनुसार न्यायालयाने आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here