Home परभणी किमान ठाकरे सरकारने मराठवाड्यासोबत सावत्र व्यवहार कर नये – रेखा ठाकुर

किमान ठाकरे सरकारने मराठवाड्यासोबत सावत्र व्यवहार कर नये – रेखा ठाकुर

सवलती अभावी हक्कापासून दूरावलेल्या मराठा समाजास कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळायला हेव असे प्रतिपादन अशोक हिंगे यांनी केले

270
0

मराठवाडा साथी न्यूज

परभणी: महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेकदा मराठवाड्याला मुख्यमंत्री पद देऊन ही मराठवाड्याला भवासवाड बनवण्याचे पाप जोड काँग्रेसने ने केले आहे या मुळे किमान उध्दव ठाकरे प्रमुख असलील्य सरकारने तरी मराठवाड्यासोबत सावत्र व्यवहार न करता मराठवाडयाला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून विशेष पॅकेज देण्याची भुमिका  ध्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेत्या रेखा ठाकुर यांनी केली.

तसेच मराठवाडा अध्यक्ष अशोक शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपण आग्रही असल्याचे भूमिका त्यांनी या प्रेसमध्ये व्यक्त केली त्या परभणी येथे संपन्न होत असलेल्या मराठवाडास्तरीय बैठकी निर्मित आयोजीत पत्रकार परिमदे भधे बोलत होत्या. या वेळी प्रदेश प्रवक्ते फारूक  अहमद, गोविंद दळवी, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील कार्यक्रमाचे संयोजक डॉ. धर्मराज चव्हाण, प्रा डॉ. सुरेश शेळके सह उपाध्यक्ष केशव मुदेवाड समस्त मराठवाडा कार्यकारीणी य सर्व जिल्यातील प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते.

आपली भूमिका स्पष्ट करत असताना रेखा ठाकुर पुढे म्हणाल्या की, गेल्या .  तीस  चाळीस वर्षात मराठवाड्याकडे राज्यांकर्त्यांचे दुर्लक्षित व भेदभाव करण्याच्या धोरणामुळे मराठवाडा हे सर्वाधीक शेतकरी आत्महत्यांचे केंद्र तर बनलेच, औद्योगिक वसाहती औसाड पडल्यामुळे बेरोजगारीचा बेरोजगारीचा भस्मासुर प्रचंड वाढला आहे व निकृष्ट दर्जाच्या शिक्षणामुळे पुणे मुंबईत सुध्दा नौकर्या भेटत नसल्यामुळे मराठवाड्यातील तरुणांचे भवितव्य अंधारात आले आहे.

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या सावलीत सततच्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेती व शेतकरी संपत असताना सरकारकडून दुजाभाव करत न्यायीक नुक्सान भरपाई ही मिळत नाही व पिक विम्याचा लाभ शेतक-यांऐवजी विमा करन्याव मिळवून देण्यात सरकार मग्न आहे असे ही त्यांनी सांगोताले मराठवाड्यातील समस्यांवर राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी औरंगाबाद येथे होणारी एक दिवसीय मंत्रीमंडळाची बैठक सुध्दा अनेक वर्षापासुन घेण्यात आली नाही वैधानीका विकास मंडळाला ऐतिहासिक बाब बनवण्याचे पाप सरकारकडून होत आहे.

या सर्व भेदभावांना दूर करने मुख्यमंत्र्यानी मराठवाड्यावर होणारा अन्याय दुर करत मराठवाड्यातील शेतक-यांना दिवाळीपूर्वी सरसकट नुक्सान भरपाई व पिक विम्याची रक्कम ध्यावी  अन्यथा विभागीय स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्या शिवाय वंचित बहुजन आघाडी कडे पर्याय राहणार नाही असा इशाराही पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here