Marathwada Sathi

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या…!

मराठवाडा साथी न्यूज

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ (ता.पारनेर) सोमवारी(३० नोव्हें.)रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

जरे या सोमवारी कामानिमित्त पुणे येथे गेल्या होत्या. पुणे येथून कारने नगरकडे येत असताना जातेगाव फाटा नजिक मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना अडविले.यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या जरे यांना काही वेळातच नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version