Marathwada Sathi

लव्ह जिहादवरून नितेश राणे- अबु आझमी यांच्यात वादावादी

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे.विधानभनबाहेर प्रसारमाध्यमांसोर बोलताना नितेश राणे यांनी मदरसा अनधिकृतपणे उभारलं जात असल्याचा मुद्दा मांडला. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात आहे अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. त्यावर कारवाई करताना हत्यारं काढली जातात, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो असं आव्हानच दिलं.त्यावर अबू आझमी यांनी कोणत्याही धर्माचं असलं तरी अनधिकृत बांधकाम तोडलं पाहिजे असं मत मांडलं. हे खोटं असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो. पण हे खोटं आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे असं म्हटलं.त्यानंतर नितेश राणे यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. पाहिल्यानंतर तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल, हे माझं तुम्हाला आव्हान आहे असं नितेश राणे म्हणाले.तारीख आणि वेळ सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो असं नितेश राणे म्हणाले. त्यावर अबू आझमी यांनी मी तुम्हाला खोटं आहे सांगायला 50 ठिकाणी घेऊन जातो असं प्रत्युत्तर दिलं. तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा असं नितेश राणे यावेळी अबू आझमींना म्हणाले.त्यानंतर राणे यांनी माध्यमांशी बोलताना आझमी यांच्या लव्ह जिहादबाबतच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. लव्ह जिहाद आणि धर्मांकर या बाबत मी खरी माहिती देत आहे, हे त्यांना खटकले आहे. त्यामुळे त्यांची तडफड होत आहे, त्यामुळे ते माझ्या जवळ आले, त्यांची पोलखोल होईल, याची भीती त्यांना वाटत आहे.परंतु, आपल्या हिंदू तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, तेव्हा हे जबाबदारी घेतील का ? यांच्या हरकतीमुळे अशा लोकांना मदतच होत आहे. हे त्यांना कळत नाही. लव्ह जिहादवरून हिंदू तरुणींचे आयुष्य बरबाद होऊल तेव्हा हे पुढे येतील का ? यांच्या सारखा ज्येष्ठ माणूस मुलींचे आयुष्य बरबाद करत असेल, तर हे योग्य नाही, असा संताप भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version