Home अहमदनगर तपासणीपासून वाचण्यासाठी प्रवाश्यांनी काढला दुसरा मार्ग…!

तपासणीपासून वाचण्यासाठी प्रवाश्यांनी काढला दुसरा मार्ग…!

73
0

मराठवाडा साथी न्यूज

अहमदनगर : कोरोना व्हायरस आता प्रकारात आला आहे या व्हायरसच्या नवीन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर भाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईत कडक तपासणी करण्यात येत आहे. मात्र,या तपासणी पासून वाचण्यासाठी प्रवाश्यांनी दुसरा मार्ग शोधला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी सरळ मुंबईत न येतात हैद्राबादमार्गे येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता हैद्राबादहून आलेल्या प्रवाशांवरही प्रशासानाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर राज्य शासनाने त्या देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही प्रवासी हे मुंबईहून न येता हैदराबाद मार्गे येऊ शकतात. त्यामुळे २५ नोव्हेंबर, २०२० पासून परदेश प्रवास करुन अशा प्रकारे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here