Marathwada Sathi

कंगनाचे अजून एक वादग्रस्त विधान …

मुंबई : आज अभिनेता सुशांत सिंह चा वाढदिवस आहे. दरम्यान त्याच्या आत्महत्येनंतर सर्व बॉलीवूडला धक्का बसला होता. त्याचे स्मरण करत त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रानौत ने एक वादग्रस्त ट्विट केले आहे.तिने ट्वीटच्या माध्यमातून यशराज, महेश भट्ट आणि करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगनाने तिच्या ट्विटटर अकाऊंटवर सुशांत सिंह राजपूतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘प्रिय सुशांत, मूव्ही माफियांनी तुला त्रास दिला, तू सोशल मीडियावर अनेकदा मदतीसाठी विनंती केलीस पण मी तुझी मदत करु शकले नाही याचे मला दु:ख होते. तू या मूव्ही माफियांचे टॉर्चर सहन करण्यास सक्षम आहेस असे मी गृहीत धरायला नको होते’ या आशयाचे ट्वीट कंगानाने केले आहे.त्यानंतर तिने आणखी दोन ट्वीट केले आहेत. या ट्वीटमध्ये तिने करण जोहर, यशराज फिल्मस आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे.सोशल मीडियावर कंगनाचे हे ट्वीट तुफान व्हायरल झाले असून चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.

Exit mobile version