Home मुंबई अकरावी प्रवेशासाठी अजून एक संधी…!

अकरावी प्रवेशासाठी अजून एक संधी…!

58
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरोनामुळे राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाकडून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अत्यंत महत्वाचे बदल करण्यात आले होते.त्यानंतर तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवण्याचा हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून निर्णय घेण्यात आला.मात्र,यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही.त्यामुळे आता अश्या विध्यार्थ्यांसाठी बुधवारपासून(१३ जाने.) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यात येणार आहे.आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये महाविद्यालय अलॉट न झालेले,प्रवेश नाकारलेले तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण, दहावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी असलेले विद्यार्थी या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी ही अकरावी प्रवेशाची अखेरची फेरी असणार आहे. मात्र,ही फेरी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार नाही, असे आवाहनही शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.

असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक :

१३ जाने. – ९० ते १०० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
१३ ते १५ जाने. – महाविद्यालयात जाऊन प्रवेश गेणे
१५ जाने. – रिक्त जागा जाहीर
१६ जाने. – ८० ते १०० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
१६ ते १८ जाने. – महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
१८ जाने. – रिक्त जागा जाहीर
१८ जाने. – ७९ ते १०० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
१९ ते २० जाने. – महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे
२० जाने. – रिक्त जागा जाहीर
२१ जाने. – ६० ते १०० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
२१ ते २२ जाने. – महाविद्यालयात जाऊन प्रवेश गेणे
२२ जाने. – रिक्त जागा जाहीर
२३ जाने. – ५० ते १००टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
२२ ते २५ जाने. – महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
२५ जाने. – रिक्त जागा जाहीर
२७ जाने. – उत्तीर्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश
२७ ते २८ जाने. – महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
२८ जाने. – रिक्त जागा जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here