Marathwada Sathi

आणि त्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्तेचा ‘पुरस्कार’ नाकारला…!

मराठवाडा या साथी न्यूज

नवी दिल्ली : पंजाबमधील कृषीतज्ज्ञ डॉ. विरेंद्र पाल सिंग यांनी सोमवारी (दि.७)केंद्राकडून दिला जाणारा पुरस्कार घेण्यास नकार दिला. कृषी कायद्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचे दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा पुरस्कार नाकारला.

शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सिंग यांनी हा पुरस्कार नाकारला. सिंग हे पंजाबमधील लुधियाना येथील कृषीविद्यापिठामध्ये मातीचे परिक्षण करणाऱ्या विभागाचे प्रमुख आहेत. सिंग यांना झाडांच्या पालनपोषणासंदर्भातील क्षेत्रात केलेल्या कामासाठी फर्टीलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी नवी दिल्लीमध्ये पार पडला. केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाचे मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते सिंग यांना सन्मानित करणार होते. सिंग यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते मंचावर आले मात्र त्यांनी पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला. ते म्हणाले, “शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना मला माझी सदसद्‍विवेकबुद्धी हा पुरस्कार स्वीकारण्याची परवानगी देत नाही.” असे सांगत सिंग मंचावरुन पुरस्कार न स्वीकारताच खाली आले.

Exit mobile version