Home अंबाजोगाई अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा पडताळणी समितीची चौकशी होणार

अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा पडताळणी समितीची चौकशी होणार

1081
0

अंबाजोगाई
अंबाजोगाई येथील
सार्वजनिक बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम उपविभाग (वि.प्र.) मेडीकल परीसरच्या ई-निविदा उघडणा-या प्राधिकारी तथा निविदा पडताळणी समिती यांची चौकशी होणार आहे.याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य समन्वयक संजय वाघमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव यांना 15 डिसेंबर रोजी निवेदन दिले होते.त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंञालयातील कार्यासन अधिकारी सुनिल बागुल यांनी संजय वाघमारे यांचे सदरील पञांतील मुद्यांबाबत सविस्तर चौकशी करून शासनास अहवाल सादर करावा असे आदेश नुकतेच मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,औरंगाबाद यांना पारीत केले आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (अ.जा.विभाग) राज्य समन्वयक संजय वाघमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव यांना 15 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,सार्वजनिक बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम उपविभाग (वि.प्र.) मेडीकल परिसर,अंबाजोगाई येथील ई-निविदा प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.ई-निविदा सुचना क्रं.27 सन 2019-2020 मधील कामाचा क्रं.5,6,7,8, तसेच ई-निविदा सुचना क्रं.एबीजे/05 सन 2020-2021 कामाचा क्रं.2,3,4,6 कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांनी नोंदणीकृत कंत्राटदार यांच्याकडुन ई-निविदा (ऑनलाईन) मागविण्यात आल्या होत्या.दुरूस्तीच्या कामाची निविदा काढून आपल्या मर्जीतील लोकांना कामे देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या.कार्यकारी अभियंता व अधिकारी यांच्या संगनमताने हेराफेरी करुन मर्जीतील कंत्राटदारालाच कामे मिळतील याची व्यवस्था केली.त्या खर्चात नव्याने इमारत बांधण्यात आल्या असत्या.या विभागामार्फत कोट्यावधी रूपये दुरूस्ती करण्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत.ई-निविदा उघडण्यापूर्वी कार्यकारी अभियंता यांनी निविदा भरलेल्या कंत्राटदार यांना पार पाडण्यात आलेल्या त्या निवीदेसंबंधी प्रक्रियेची माहिती देण्यात आलेली नाही.Bid Lock दिनांकापर्यंत ई-निविदा भरणा-या कंत्राटदाराची कोणतीही तक्रार नाही असे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावयाचे असतांना कंत्राटदार उपस्थित नसतांना निविदा उघडणे ही बाब संशय निर्माण करणारी व पारदर्शकतेला छेद देणारी आहे.ई-निविदा सुचना क्रं.एबीजे/05/सन 2020-2021 मधील अंबाजोगाई येथील 04 कामांचा समावेश होता.गेली 6 महिने निविदा प्रलंबीत ठेवून क्रं.3,4,6 या क्रमांकाची कामे उघडण्यात आली व त्यातील क्रमांक 2 चे काम जाणूनबुजुन आजपर्यंत प्रलंबीत ठेवण्यात आलेले आहे.ई-निविदा स्विकृती कालावधी दिनांक 11/06/2020 ते 25/06/2020 रोजी 18.55 वा.राहील व शक्य झाल्यास ई-निविदा उघडण्याचा दिनांक 29/06/2020 रोजी 11.00 पुढे वेळ दिलेला असतांना जून,जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर 4 महिने निविदा उघडणे प्रलंबित ठेवून निविदा 20 ऑक्टोबर 2020 रोजी उघडण्यात आल्या आहेत.लिफाफा क्रं.1 उघडल्यानंतर त्यातील सर्व कागदपत्रांची छाननी करून पात्र/ अपात्रतेची कारणे कंत्राटदारास कळविणे आवश्यक असतांना कार्यकारी अभियंता यांचेकडून कळविण्यात आलेले नाही.त्यांचा मनमानी कारभार चालतो यावरून दिसुन येतो.लिफाफा क्रं.2 उघडताना आजपर्यंत कोणत्याही कंत्राटदाराला प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आलेला नाही किंवा कंत्राटदाराच्या समोरच त्यांचे प्राप्त झालेले देकार किती दराचे आहे कळाले असते.ही सर्व प्रक्रिया कार्यकारी अभियंता यांची संशय घेणारी आहे.चक्क ई-निविदा मॅनेज करत आपल्या जवळच्या मंडळींना कामाचे वाटप व्हावे यासाठी विभागातील कार्यकारी अभियंता व संलग्न समिती कर्मचारी यांनी निविदा उघडण्याची सुचना कंत्राटदार यांना देण्यात आलेली नाही.कंत्राटदाराच्या उपस्थितीत निविदा उघडावयाचे असताना त्या उघडण्यात आलेल्या नाहीत किंवा निविदा उघडणा-या अधिकारी यांनी कंत्राटदारास पात्र/अपात्र ठरविण्यापुर्वी लिखित स्वरूपात पत्रव्यवहार केलेला नाही.या निविदा कंत्राटदाराच्या अनुपस्थितीत उघडण्यात आलेल्या आहेत.या समितीने चालाखीने ही प्रक्रिया प्रलंबीत ठेवून राबविली गेली.जी कामे ई-निविदा पध्दतीने मंजुर केली आहेत,त्या कामासाठी निविदा प्राप्त होवूनही पात्र निविदाधारकास देण्यात आल्या नाहीत.बहूतांश कामाच्या बाबतीत हीच पध्दत कार्यकारी अभियंता यांच्याकडून अवलंबिण्यात आली.त्यामुळे पात्र ठरणारे कंत्राटदार या प्रक्रियेतुन दुर फेकले गेले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासुन सा.बां.विभाग अंबाजोगाई कार्यालयातील निविदा विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या न झाल्यामुळे ते कर्मचारी येथेच ठाण मांडुन बसलेले आहेत.निविदा वाटपामध्ये अनियमितता करणा-या कार्यकारी अभियंता व संलग्न समिती कर्मचारी यांचेवर नियमास अनुलक्षून ई-निविदा प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती संजय बालासाहेब वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात केली होती.निवेदनाच्या प्रती
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण,मुख्य सचिव, मुख्य अभियंता, महालेखापाल-2 नागपुर,अधिक्षक अभियंता,सा.बां. मंडळ उस्मानाबाद, जिल्हाधिकारी,बीड यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here