Home औरंगाबाद औरंगाबादेत 532 कोरोनाबाधितांची वाढ ; सात मृत्यू

औरंगाबादेत 532 कोरोनाबाधितांची वाढ ; सात मृत्यू

2621
0

सलग दुसऱ्या दिवशी आकडा पाचशेच्या वर

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाचशेच्यावर कोरोनाबधित रुग्ण आढळून आले. बुधवारी दिवसभरात 532 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 54439 झाला आहे. आजपर्यंत एकूण 1311 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3515 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 231 जणांना (मनपा 188, ग्रामीण 43) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 49613 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (443)

घाटी परिसर (6), हरीराम नगर (1),आदित्य नगर (2), सातारा परिसर (4), आयएमए हॉल (1), एन-8 सिडको (4), पीर बाजार (1), जालन नगर (2), स्टेशन रोड परिसर (2), बीडबाय पास परिसर (9), मयूर पार्क (3), सिडको (12), मुकुंदवाडी (3), कैलास नगर (2),संजय नगर (2), एन-5 सिडको (4), एन-9 सिडको (3), उस्मानपुरा (4), शहानूरवाडी (6), पिसादेवी रोड परिसर (1), त्रिमूर्ती चौक (2),भवानी नगर (2),चिकलठाणा (2),एन-6 सिडको (5),पडेगाव (2), अजबनगर (2), तापडिया नगर (1), हिंदुस्थान आवास (2),एसबीएच कॉलनी (3), पुष्प नगरी (4), शिल्प नगर (1), औरंगपुरा (1), श्रीनिकेतन कॉलनी (1), बालाजी नगर (7), वेदांत नगर (2), कांचनवाडी (1), ज्योती नगर (2), एन-2 सिडको (8), प्रताप नगर (4), गारखेडा (6), पुंडलिक नगर (4),बन्सीलाल नगर (2),रेल्वे स्टेशन परिसर (5), पद्मपुरा (1), एकनाथ नगर (1),जाधववाडी (1),नाथ व्हॅली रोड परिसर (1),जटवाडा (2),टिव्ही सेंटर (1), समर्थ नगर (2), शाह कॉलनी (1), उल्कानगरी (9),मनीष कॉलनी (1), शेरवन टावर (2), सराफा रोड (1), हायफिल्ड प्रा.लि (1), हर्सूल (8),शास्त्री नगर (2),शाकुंतल नगर (1),न्यायमूर्ती नगर (1), शाह बाजार (1), हडको (3), नवीन मोंढा (1), शिवेश्वर कॉलनी (1), माऊली नगर (4), बजाज हॉस्पिटल (1), पैठण रोड परिसर (1), जयसिंगपूरा (1), एन-3 सिडको (1),म्हाडा कॉलनी (1), हायकोर्ट परिसर (2), टाऊन सेंटर (1), एन-4 सिडको (4), कामगार चौक (1), जय भवानी नगर (7),संघर्ष नगर (1), शाहनगर (1), हनुमान नगर (4), हॉटेल फर्न रेसिडेन्सी (1), एन-7 सिडको (5), आकाशवाणी (3),स्वामी विवेकानंद नगर (1),खिवंसरा पार्क (1),बजरंग चौक (2), शिवाजी नगर (7), संदेश नगर (1), गजानन नगर (1), गादिया विहार (1), मेहेर नगर (1),विष्णू नगर (3), मयूरबन कॉलनी (1), देवळाई परिसर (3), चौरंगी हॉटेल (1), सिंधी कॉलनी (3),शंभू नगर (1), अग्निहोत्री चौक (1), शिवशंकर कॉलनी (3), कलेक्टर ऑफीस परिसर (1), सिंधू कॉलनी (1), नक्षत्रवाडी (1), शिवनेरी कॉलनी (1), व्यंकटेश नगर (1), सेंट्रल नाका (2), टिळक नगर (3), सुराणा नगर (2), राम नगर (1), सदानंद नगर (1), सह्याद्री नगर सिडको (1), दशमेश नगर (2), श्रेय नगर (2), इटखेडा (3), आरटीओ ऑफिस परिसर (1), सिद्धार्थ नगर (1), राधामोहन कॉलनी (1), खडकेश्वर (1), नागेश्वरवाडी (2), अन्य (162)

ग्रामीण (89)

गंगापूर (1), करमाड (2),वरुडकाझी (1), बजाज नगर (16), वडगाव (4), वाळूज महानगर (4),सिडको महानगर (2),पंढरपूर (1), वळदगाव (1),पैठण(1),खुलताबाद(1),शेंद्रा (2), वडगाव (1), अन्य (52)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत माळीवाडा, औरंगाबाद येथील 64 वर्षीय पुरूष, हुसेन कॉलनी, गारखेडा येथील 70 वर्षीय पुरूष, सांगवी, लासूर स्टेशन येथील 75 वर्षीय पुरूष , खुलाताबाद तालुक्यातील आझमपूर येथील 60 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांमध्ये नारळीबाग येथील 37 वर्षीय पुरूष, क्रांती चौकातील 70 वर्षीय स्त्री, श्रद्ध हॉस्पीटल परिसरातील 71 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here