Home इतर आश्चर्यकारक ! म्हशीसाठी ठेवले ‘बॉडीगार्ड’…!

आश्चर्यकारक ! म्हशीसाठी ठेवले ‘बॉडीगार्ड’…!

209
0

मराठवाडा साथी न्यूज

पंजाब : पंजाबमधील लुधियाना येथे एका म्हशीची किंमत तब्बल ५१ लाख रुपये आहे.या म्हशीचे नाव सरस्वती असुन लुधियानातील पवित्र सिंह नामक शेतकऱ्याने या सरस्वतीला हरियाणातील हिसारच्या एका शेतकऱ्याकडून तब्बल ५१ लाख रुपये देऊन खरेदी केले आहे. विशेष म्हणजे याच म्हशीच्या रेडकू जन्म होण्याअगोदरच ११ लाख रुपयांनी विकण्यात आला.

या ५१ लाखांच्या सरस्वती सोबतच पवित्र सिंग यांच्याकडेम्हशी आहेत.सरस्वती विषयी अधिक विचारले असता त्याने सांगितले की,सरस्वतीला इतर जनावरांप्रमाणे चारा दिला जातो.मात्र,सामान्य खुराक असून सुद्धा सरस्वती दूध देण्यात अन्य जनावरांपेक्षाही खास आहे. सरस्वतीची खुराक सामान्य आहे मात्र तिच्या देखरेखीसाठी दोन कर्मचारी तैनात आहे. ती ३३ लिटरपेक्षाही जास्त दूध देते.

दरम्यान,सरस्वतीने एका दिवसात ३३.१३१ लिटर दूध देण्याचा रेकॉर्ड केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here