Marathwada Sathi

सर्वपक्षीय जोडे बाजूला ठेवून शहराचा सर्वांगीण विकास साधणार- आ. प्रकाश सोळंके

नगराध्यक्षपदी शेख मंजूर बिनविरोध

मराठवाडा साथी न्युज

माजलगाव:सर्वपक्षीय जोडे बाजूला ठेवून शहराचा सर्वांगीण विकास साधणार असुन आगामी काळात 31 कोटी रूपयांचे दर्जेदार कामे होणार असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगीतले. नगराध्यक्षपदी
शेख मंजूर यांच्या बिनविरोध निवडीनंतर मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांच्या निवासस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मागील तिन ते चार वर्षांपासुन पालिकेचा कारभार ठप्प होता. पालिकेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार प्रकरणी माजी नगराध्यक्ष व तत्कालिन तिन मुख्याधिका-यांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून आगामी काळात पालिकेच्या माध्यमातुन काम होणार आहे. 31 कोटी बावीस लक्ष रूपयांचा विवीध विभागाच्या निवीदा प्रक्रिया करण्यात आली आहे. ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शहराचा आठवडी बाजाराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी गट नं. 242 ची जागा निश्चीत करण्यात आली असुन या दोन एक्कर जागेत आठवडी बाजार भरणार आहे. आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालिकेच्या माध्यमातुन सर्वपक्षीय नगरसेवकांना एकत्र घेत विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. शहराचा महत्वाचा असलेला शिवाजी चैक ते शासकीय विश्रामगृह हा रस्ता देखिल होणार आहे. पत्रकार परिषदेस अशोक डक, बाबुराव पोटभरे, कचरू खळगे, अच्युत लाटे, खुर्शिद नाईक, जयदत्त नरवडे, चंद्रकांत शेजुळ, कल्याण आबुज, भाई गंगाभिषण थावरे यांचेसह नगरसेवक उपस्थित होते.

Exit mobile version