Home बीड ई-पिक पाहणी प्रशिक्षणात सर्व शेतक-यांनी सहभावी व्हावे–जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार

ई-पिक पाहणी प्रशिक्षणात सर्व शेतक-यांनी सहभावी व्हावे–जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार

275
0

बीड
जिल्हयातील सर्व 11 तालुक्यांत ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्यास शासनाने यापुर्वीच मान्यता दिली आहे. मोबाईल अॅप वर ई पिक पाहणी अॅप उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, ई पिक पाहणी उपक्रमामध्ये समाजाच्या विविध घटकांनी भाग घ्यावा. व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी ई पिक पाहाणी कामी योगदान दयावे, असे आवाहन बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

बीड जिल्हायाचा समावेश केलेला
आहे. आपण त्वरीत प्लेस्टोअर वर जावुन आपल्या मोबाईल मध्ये ई पिक पाहणी अॅप डाउनलोड करावे. आपणास ई पिक पाहाणीचे तलाठी व कृषि सहाय्यक यांचेमार्फत गाववार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आपला सहभाग
मोलाचा आहे.

गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,कोतवाल,धान्य दुकानदार,तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, अध्यक्ष, सहकारी संस्थाचे सचिव,शेतकरी उत्पादक संघ अध्यक्ष, माविम संयोगिनी, पाणी फाउडेशन
गट,पोकरा प्रतिनिधी,ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, बॅक प्रतिनिधी, शाळा व कॉलेज विदयार्थी, प्रगतशिल शेतकरी, डॉक्टर्स, सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हापरिषद सदस्य, मिडीया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र आदींनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे. सर्वांनी व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातुन ई पिक पाहणी अॅपच्या संबंधी माहिती घ्यावी. यापुढे पिक पाहणी काम शेतक-यांना स्वत:च ई पिकपाहणी अॅपच्या माध्यमातुन करता येणार आहे. ज्यामुळे
शेतक-यांना तलाठयांना शोधण्याची गरज भासणार नाही. पिक पाहणी सोबतच इतरही विविध नोंदी शेतक-यांना करता येणार असल्यामुळे पिकविमा, पिक कर्ज, शासकीय मदत आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. आपले संबंधित तालुका वाईज हेल्पडेस्कच्या माध्यमातुन
सकाळी 8:00 ते सायं. 6 वाजेपर्यत ई पिक पाहणी संबंधित शंका व अडचणी असल्यास खालील क्रमांकावर विचारुन त्याचे आपणास निरसन करता येणार आहे. उपरोक्त ई पिक पाहणी उपक्रमामध्ये समाजाच्या विविध घटकांनी भाग घ्यावा. व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी ई पिक पाहाणी कामी योगदान दयावे, असे आवाहन बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here