Home इतर मागील २ महिन्यांपासून अलीबाबा समुहाचे संस्थापक रहस्यमयरीत्या ‘गायब’…!

मागील २ महिन्यांपासून अलीबाबा समुहाचे संस्थापक रहस्यमयरीत्या ‘गायब’…!

283
0

मराठवाडा साथी न्यूज

बीजिंग : संपूर्ण जगातील क्र.३ चे श्रीमंत आणि अलीबाबा समुहाचे संस्थापक जॅक मा मागील २ महिन्यांपासून रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.‘आफ्रिका बिझनेस हिरोज’ या त्यांच्या स्वतःच्याच टॅलेंट शोमध्येही ते उपस्थित नसल्याने हा संशय खरा असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.यूके टेलिग्राफच्या मते जॅक मा हे या कार्यक्रमाचे परीक्षक होते.मात्र, नोव्हेंबरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या जागी त्यांच्या अलीबाबा समुहाच्या कार्यकारी अधिकाऱ्याने हजेरी लावली.फक्त एव्हढेच नाही तर त्यांचा फोटोही वेबसाइटवरुन काढून टाकण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी शांघाय इथे झालेल्या एका भाषणात वादग्रस्त भाषण देत चीनच्या नियामक प्रणालीवर टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जॅक मा यांनी व्यवसायात नवनवीन संकल्पना आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना लोकांना त्यांचे स्वातंत्र द्यावे आणि त्यांच्यावर सरकारी दडपण आणू नये, असे म्हटले होत. तसेच त्यांनी जागतिक बँकिंगच्या नियमांना ‘वृद्धांचा अड्डा’ म्हणत खोचक टीकाही केली होती. या भाषणानंतर त्यांना चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या क्रोधाला सामोरे जावे लागले होते.

महिन्यांअगोदर भाषण करतांना जॅक मा म्हणाले होते की,आजची वित्तीय व्यवस्था ही अत्यंत जुन्या उद्योगावर आधारित असून नव्या पिढीसाठी यात निश्चितच बदल केले पाहिजेत.त्यांना उद्योक अँट आयपीओला चीनच्या प्राधिकरणाकडून हिरवा कंदील देखील मिळाला होता.मात्र, या भाषणानंतर काही आठवड्यातच त्याचा परवाना रद्द करण्यात आला. दरम्यान,मागील वर्षी १० ऑक्टोबर रोजी जॅक मा यांनी अखेरचं ट्वीट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here