Marathwada Sathi

अनेक ठिकाणी दहा किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : आतापर्यंत राज्यात बर्ड फ्लू या विषाणूमुळे चक्क ३ हजार ५९६ पक्षांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती आज पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देत प्रतापसिंग म्हणाले की,“बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत ३ हजार ५९६ पक्षांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये कोंबड्या,कावळे आणि बागळ्यांचा समावेश आहे.जिथे बर्ड फ्लूमुळे पक्षांचे मृत्यू झाले आहेत, त्याठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. शक्यता वाटल्यास कंट्रोल ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कायद्यानुसार सर्व अधिकार दिलेत”. तसेच,“आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर फेस्टिव्हलचे आयोजन करावे.आज पशूसंवर्धन आयुक्तालयात चिकन अंडी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.बर्ड फ्ल्यूचं संक्रमण माणसांत नाही. आत्तापर्यंत त्याचे एकही उदाहरण नाही”असे देखील प्रतापसिग यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,“७० डिग्रीवर चिकन,अंडी शिजवावे, त्यात कुठलाही व्हायरस टिकत नाही. एक किलोमीटरच्या आत एखादा बर्ड फ्ल्यूचा व्हायरसमुळे पक्षी मृत आढळला, तर त्या परिसरात असलेल्या पोल्ट्रीतील पक्षी मारले जाईलच,याबाबत केंद्राचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरलाय”असेही प्रतापसिंग यांनी सांगितले.

Exit mobile version