Home नांदेड एअर इंडियाची नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरु…!

एअर इंडियाची नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरु…!

882
0

मराठवाडा साथी न्यूज

नांदेड : कोरोनामुळे बंद केलेली एअर इंडियाची विमानसेवा ही पुन्हा सुरु करण्यात आली आहे.याअगोदर नांदेड-आमृतसर,अशी सेवा सुरु करण्यात आली होती.मात्र,प्रवाशांच्या मागणीनुसार आता ही सेवा वाढवत दिल्लीपर्यंत करण्यात आली आहे. यासाठी एअर इंडियाकडून प्रवासी बुकींग सुरू झाले आहे.१९ डिसेंबर पासून हि सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती नांदेड स्टेशन मॅनेजर गजेंद्र गुठे यांनी दिली.ही विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सुरू अशी आठवड्यातून ३ दिवस राहणार आहे.सुरवातीचे भाडेदर दिल्ली ते नांदेड हे तीन हजार ९५६ रुपये असणार आहे.१६२ आसनक्षमता असलेल्या या विमानसेवा कोविडच्या नियमानुसार प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही गुठे यांनी केले आहे.

दरम्यान,नांदेडहूनही शिखबांधव अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. या दोन्ही पवित्र स्थळांना आता एअर इंडियाच्या विमानसेवेच्या माध्यमातून जोडल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here