Home मनोरंजन पुन्हा एका सेलेब्रिटीच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट

पुन्हा एका सेलेब्रिटीच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट

7
0

मुंबई: समाज माध्यमांवर सेलिब्रिटींच्या नावाने खोटे अकाउंट ओपन करून त्यावरून आक्षेपहार्य माहिती पसरवण्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. यावेळी अभिनेत्री रविना टंडन हिच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट सुरु असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविनाच्या नावाने सुरु असलेल्या या फेक अकाऊंटवरुन मुंबई पोलिसांना बदनामी करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होणाऱ्या रविनाच्या नावाने सुरु असलेल्या या फेक अकाऊंटवरुन मुंबई पोलीस आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचं दिसून येत आहे. सोबतच मराठी भाषा आणि मराठी भाषिक व्यक्तींवरदेखील टीका करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

यापूर्वीदेखील अनेक सेलिब्रिटींच्या नावाने फेक अकाऊंट तयार करण्यात आल्याचे समोर आलं आहे. यात अलिकडेच अभिनेता सोनू सूदच्या नावाने फेसबुक, ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करुन नागरिकांकडून पैसे उकळ्याचा प्रकार समोर आला होता. सध्या मराठी भाषा, मुंबई पोलीस आणि राज्यातील इतर मुद्दे अनेकदा चर्चेत येत असून राजकारणी आणि सेलिब्रिटी यांचा देखील यामध्ये वेळोवेळी उल्लेख होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here