Marathwada Sathi

नाटू नाटू’च्या विजयानंतर ज्युनियर एनटीआरने आनंद व्यक्त केला, म्हणाला- ‘हा भारताचा विजय’

RRR या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा किताब पटकावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल आरआरआर चित्रपटाचा अभिनेता ज्युनियर एनटीआरने आनंद व्यक्त केला आहे.
ज्युनियर एनटीआर म्हणाला, ‘आनंद व्यक्त करण्यासाठी मला सध्या शब्द मिळत नाहीयेत. हा केवळ आरआरआरचा विजय नसून एक देश म्हणून भारताचा विजय आहे. माझा विश्वास आहे की, ही फक्त सुरुवात आहे. भारतीय सिनेमा किती पुढे जाऊ शकतो हे आता दिसत आहे. किरवानी गुरु आणि चंद्रबोस गुरु यांचे अभिनंदन. राजामौली नावाचा मास्टर कथाकार आणि आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या प्रेक्षकांशिवाय हे नक्कीच शक्य झाले नसते. मला ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ च्या टीमचे आज त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करायचे आहे, ज्याने भारताला आणखी एक ऑस्कर मिळवून दिला आहे.
नाटू नाटू व्यतिरिक्त, ९५ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ने सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा पुरस्कार जिंकला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केले आहे, तर गुनीत मोंगा निर्माती आहेत. मात्र द एलिफंट व्हिस्पर्सने बाजी मारली. विशेष बाब म्हणजे या श्रेणीत ऑस्कर जिंकणारा द एलिफंट व्हिस्पर्स हा पहिला भारतीय चित्रपट आहे आणि त्यानंतर नामांकन मिळालेला तिसरा चित्रपट आहे.

Exit mobile version