Marathwada Sathi

दिल्लीनंतर आता मध्य प्रदेश भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी दिल्ली आणि परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता, त्यानंतर आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात आज सकाळी १०.३१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ४ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याचं समोर आलं आहे. या भूकंपामुळं कुठल्याही नुकसानी नोंद झालेली नाही. पण एका भविष्यवाणीची त्यामुळं चर्चा सुरु झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथं आज सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ग्वाल्हेरच्या आग्नेय दिशेला २८ किमीवर या भूकंपाचं केंद्र होतं. या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाबरोबरच भारतातही भूकंप होईल अशी भविष्यवाणी फ्रँक होगरबीट्स या डच संशोधकानं केली होती. त्यानुसार, नुकतेच दिल्लीसह परिसरात काल भूकंपाचे मोठे झटके अनुभवायला मिळाले होते.
एका व्हिडिओच्या माध्यामातून होगरबिट्स यांनी ही भविष्यवाणी केल्याचं दिसून आलं होतं. त्यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटलं होतं की, “यापुढे भूकंपाचे झटके अफगाणिस्तानातून सुरु होऊन पुढे पाकिस्तान, भारतानंतर हिंदी महासागरापर्यंत जाणवतील. होगरबीट्स हे नेदरलँडचे रहिवाशी असून सोशल सिस्टिम जॉमेट्री सर्वेअर म्हणून काम करतात. होगरबीट्स हे स्वतःला भूकंपाचे संशोधक आहेत, अवकाशातील घटनांच्या अभ्यासातून त्यांनी ही भविष्यवाणी केली होती.

Exit mobile version