Marathwada Sathi

ग्रामपंचायतीवर सेनेचा झेंडा फडकविणार्‍या महिला सदस्यांचा अ‍ॅड. संगिता चव्हाणकडून सन्मान

बीड
बीड जिल्हा हा कायम शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम करणारा जिल्हा राहिला आहे. जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकविला. यासाठी महिला रणरागिणी सदस्यांने अहारोत्र परिश्रम घेवून निवडणुकी यश मिळवत निवडूण येवून शिवसेनेचे पारडे जड केल्याने ग्रामपंचायतीमध्ये निवडुण आलेल्या महिला सदस्यांचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी शिवसेना जिल्हा कार्यालयात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते निवडूण आलेल्या महिला सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
राजकारणाचा मुख्य पाया म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक होय. या निवडणुकीत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच नेते आपली प्रतिष्ठापणाला लावून काम करत असतात यातही आपली प्रतिष्ठा आणि आपला झेंडा कायम ठेवण्याचे काम शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांने काम करत यश मिळवित जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. सोमवारी शिवसेनेच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये  पोखरी, गुंधा, वासनवाडी, कर्झणी, जिरेवाडी, तिप्पटवाडी, वरवटी-आहेर धानोरा, वायभटवाडी, गुंधावाडी, कदमवाडी, कारळवाडी-निर्मळवाडी, म्हाळसापुर, बेलखंडी (पाटोदा),नागापुर (बु्र), मानेवाडी या ग्राम पंचायतचा समावेश होतो तर वंजारवाडी, मौजवाडी,मौज-ब्रह्मगाव, काटवटवाडी, कोळवाडी या ग्रामपंचायत अगोदर शिवसेनेच्या ताब्यात बिनविरोध आलेल्या आहेत. 
 बीड तालूक्यातील 29 ग्राम पंचायतीच्या निवडणूका झाल्या त्यापैकी 23 ठिकाणी शिवसेनेच्या शिलेदारांनी ग्रामपंचायतवर भगवा फडकावला आहे.  बीडच्या शिवसैनिकांनी आखलेली व्युहरचना अखेर विरोधकांना पराभवाच्या खाईत लोटणारी ठरली आहे. ग्राम पंचायतींवर शिवसेनेच्या भगवा फडकावणार्‍या विजयी महिला शिलेदारांचा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात मंगळवार दि. 19 जानेवारी रोजी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण, उपजिल्हाप्रमुख फरजाना शेख, रेखा वाघमारे, संगिता वाघमारे, ललिता आडाणे, शांता राऊत, सारिका राठोड, लक्ष्मी गुरूकुल, चंदा पवार, मंदा गायकवाड, काजल गायकवाड, गया गायकवाड, अर्चना चंद्रकांत करांडे, अरूणा दशरथ मोमीन, संजिवनी मदन वाघमारे, कमलबाई बालकिसन राठोड यांची उपस्थिती होती.

Exit mobile version