Home मराठवाडा फुलांच्या आरासने सजला विठ्ठल , कोरोनाने अडला भक्त

फुलांच्या आरासने सजला विठ्ठल , कोरोनाने अडला भक्त

164
0

पंढरपूर : कार्तिकी-एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे.रुक्मिणी मातेच्या मंदिरालाही आकर्षक आरास केली आहे. वेगवेगळ्या फुलांनी विठुरायाचे रूप बहरून आले आहे. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे विठूरायाची पंढरी भक्तांविना सुनी सुनी झाली आहे. मंदिरे तर उघडली आहे. मात्र अजूनही काही निर्बंध कायम आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने साजरी होणारी कार्तिकी एकादशी यावर्षी प्रतीकात्मक स्वरूपात साजरी होत आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन घेतले. राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here