Marathwada Sathi

परळीत नियम मेडणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाची कारवाई

परळी । सकाळी ०७ ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्याची मुभा आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करून सायंकाळी ०७ वाजेनंतर दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांवर आज परळीत प्रशासनाने कारवाई केली आहे. मंगळवारी सायंकाळी नायब तहसिलदार बी.एल.रूपनर व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

जिल्हाधिकारी बीड यांनी कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी काही नियम लागू गेले आहेत. नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, ते न करणाऱ्यांच्या विरूध्द फौजदारी कारवाई करण्याची तरतूद जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात आहे. असे असतांना काही दुकानदार वारंवार प्रासनाने सुचना देऊनसुध्दा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले होते. ही बाब लक्षात घेता मंगळवारी प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली होती. परळीच्या मोंढा भागत सायंकाळी ७ नंतर सुरू असलेल्या दुकानदारांवर तहसिल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. या भागातील एक दुकान नियमाचे उल्लंघन करून सुरू असल्याने नायब तहसिलदार बी.एल.रूपनर, तलाठी गित्ते, लिपीक वसीम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Exit mobile version