Home मनोरंजन आदित्यने शेअर केले लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओज ;मंदिरात केले लग्न…!

आदित्यने शेअर केले लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओज ;मंदिरात केले लग्न…!

225
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : आज १ डिसेंबर रोजी आदित्य नारायणने आपली गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल शी आज मंदिरात लग्न केलं. लग्नाला सुरुवात होण्यापूर्वी आदित्यने ढोल- ताशावर डान्स केला.बऱ्याच दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू होती. स्वतः आदित्यनेही लग्नाशी संबंधीत कार्यक्रमांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, आदित्य नारायणच्या लग्नाच्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात तो श्वेतासोबत भांगडा करताना दिसत आहे. दोघंही या खास प्रसंगी आनंदी तर आहेतच शिवाय प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगताना दिसत आहेत.

आदित्य नारायणने आपल्या लव लाइफबद्दल सांगताना म्हंटले की ते जवळपास १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघांची भेट पहिल्यांदा सिनेमाच्या सेट वर झाली होती. तिथे त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी जाहले हे कळलेच नाही. आदित्यला तो प्रेमात असल्याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा तो श्वेताच्या अक्षरशः मागे लागला.

https://www.instagram.com/p/CINBUpDjIjw/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here