Home मनोरंजन आदित्य नारायण बांधणार श्वेता अग्रवालशी लग्नगाठ

आदित्य नारायण बांधणार श्वेता अग्रवालशी लग्नगाठ

215
0

मुंबई : प्रसिद्ध गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायणने आपली गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत रोका केला. आदित्यच्या रोका सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.आदित्यने साधारणतः महिनाभारपूर्वीच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आदित्य आणि श्वेता जवळपास 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.आदित्य नारायण 1 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार आहे. दोघांच्याही लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आदित्य नारायण हा 90च्या दशकातील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे.आदित्यने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत. त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.आदित्यच्या रोका सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये आदित्य आणि श्वेतासोबत त्यांचे कुटुंबियही दिसत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here