Marathwada Sathi

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचे इन्स्टाग्राम अकाऊंट ‘हॅक’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : शिवसेन्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे.उर्मिला यांनी स्वत: ट्वीट करत याची माहिती दिली आहे.त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की,पडताळणी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करण्यास सांगण्यात आल्या आणि नंतर अकाऊंट हॅक झाले. असे म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे,सध्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काम सुरू आहे.

दरम्यान,अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. सुरूवातीला काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि नंतर स्वतः काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत नव्याने राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली आहे.

Exit mobile version