Home मनोरंजन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोडली “आई माझी काळूबाई” मालिका

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोडली “आई माझी काळूबाई” मालिका

10
0

सहकलाकाराने शिवीगाळ केल्याचे कारण केले स्पष्ट- वीणा जगताप घेणार प्राजक्ताची जागा !

मुंबई : ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. पण सोमवारी (2 नोव्हेंबर) ही मालिका पुन्हा चर्चेत आली ती या मालिकेतली आर्या फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या एक्झिटच्या बातमीमुळे. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप ही भूमिका साकारणार आहे. प्राजक्ताने अचानक ही मालिका सोडण्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असतानाच या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनीही प्राजक्ताबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. आता त्यावर प्राजक्ताने आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘काळूबाई’च्या सेटवर आपल्याला शिवीगाळ झाल्यानेच आपण ही मालिका सोडली असे तिने सांगितले आहे.

शिवीगाळ कुणी आणि कधी केली याबद्दल प्राजक्ताने विवेक सांगळे या कलाकाराचं नाव घेतलं आहे. ती म्हणाली, ‘आशालता वाबगावकर यांच्या निधनानंतर मुख्य कलाकारांना घेऊन या मालिकेचं चित्रीकरण मुंबईत फिल्मसिटीत करायचं ठरलं होतं. त्यामुळे एका गाडीतून मी, माझी आई, विवेक आणि ड्रायव्हर असे निघणार होतो. त्यावेळी बोलताना विवेकने आपण अनेक कोरोना पेशंट्सना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं. साहजिकच, विवेकसोबत प्रवास करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण त्यावेळी आपण सगळेच काळजी घेत होतो. सेटवरही आधीच एका ज्येष्ठ कलाकाराचा मृत्यू ओढवला होता. त्यामुळे मी त्या गाडीतून येण्यास नकार दिला. त्यानंतर विवेकने थेट मला असभ्य भाषेत बोलायला सुरुवात केली. शिवीगाळही केली. इतकं झाल्यानंतरही मालिका चालू राहावी म्हणून मी चित्रीकरण सुरु केलं. पण सहकलाकार म्हणून त्याच्यासोबतचे सीन करताना माझ्यासोबत त्याने केलेली शिवीगाळ मला सतावू लागली आणि मग मी मालिका सोडायचा निर्णय घेतला. याची रीतसर कल्पना आणि तारीख मी निर्मात्यांना कळवली होती.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here