Marathwada Sathi

अभिनेत्री कंगना परत चर्चेत …!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : नेहमीच कोणत्याना कोणत्या वादातून चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत ‘थलायवी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ए.एल विजय यांनी केलं आहे.तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांची भूमिका कंगना करत आहे . कंगना या रोलसाठी बरीच मेहनत घेत आहे. तिचे थलायवीच्या सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .जयललिता यांचा हुबेहूब लूक तयार करण्याचा यात प्रयत्न केलेला आहे. थलायवी या सिनेमामधून जयललिता यांचा जीवनपट आणि प्रेक्षकांना खूप काही शिकायला मिळणार आहे .

Exit mobile version