Marathwada Sathi

या पक्षाचे फोटो काढल्यास होणार कारवाई…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : वनविभागाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.सध्या लोणावळा या पर्यटनस्थळी एक दुर्मिळ पक्षी आढळतोय.सैबेरियातुन पहिल्यांदाच महाराष्ट्रात आलेल्या अमुर फाल्कन पक्षाचे फोटो काढण्यास मनाई करण्यात आली असून वनविभागाचे हे आदेश मोडल्यास फोटोग्राफर्सना कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.

दरम्यान,अमुर फाल्कन हा दुर्मिळ पक्षी महाराष्ट्रात पहिल्यांदाच दाखल झाला आहे.फाल्कन चे आगमन पर्यटकांचे आकर्षण केंद्र असणाऱ्या लोणावळ्यात झाले आहे.त्यामुळे या पक्ष्याचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सने गर्दी केली आहे.मात्र,फोटोग्राफर्समुळे अमुर फाल्कन ला त्रास होऊ शकतो आणि जर असे झाले तर पहिल्यांदाच विसावलेला अमुर फाल्कन हा पुन्हा इकडे येण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे या पक्ष्याचे फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.अश्या आदेशांचे फलक देखील वनविभागाने लोणावळ्यातील पर्यटनस्थळी लावले आहेत.

Exit mobile version