Home क्राइम बर्दापुर घटनेतील आरोपीस अटक

बर्दापुर घटनेतील आरोपीस अटक

370
0

महापुरूषाच्या पुतळ्याचे विटंबन प्रकरण

 मराठवाडा साथी

अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर येथील  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणातील संशयीतास दि. 31 शनिवारी पहाटे  बर्दापुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशीयीताच्या चौकशी नंतर फिर्यादीमध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये कलमांची नोंद करण्यात आली आहे.

बर्दापुर येथील डा°. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागील आठवड्यात अज्ञात माथेफिरूने दि. 28 आक्टोबर रोजी पहाटे नासधुस करत विटंबना केली होती. राज्याच्या पुरोगात्मीत्वास काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करून करण्याची मागणी सर्वस्तरातून करण्यात आली. दरम्यान, बर्दापुर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घडलेल्या या अमानवीय घटनेचा नागरीकातून तीव्र निषेध करण्यात आला. आरोपीच्या अटकेसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी बर्दापुर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडत पोलिस उपनिरीक्षकां विरोधात घोषणाबाजी केली. आरोपीच्या आटकेची मागणी करत जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, टायर जाळून घटनेचा निषेध करण्यात आला तर बर्दापुर येथील तनावाच्या वातावरणामुळे गाव बंद करण्या आले होते .

या प्रकरणातील अज्ञात आरोपीच्या तपासाठी पोलिसांची वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते

 दरम्यान, या प्रकरणाचा संशयीत आरोपी घटना घडल्या पासून विविध गाव खेड्यात फिरत होता. गुप्त खबऱ्याच्या माहितीवरुन संशयीत आरोपी वडवणी (जि. बीड) येथे असल्याची माहिती मिळताच बर्दापुर पोलिस पथकाने शनिवारी दि. 31 सापळा रचून आरोपीस वडवणी येथून ताब्यात घेतले.  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संशियीत आरोपी बर्दापुर येथील रहिवाशी असुन हल्ली परळी येथे वास्तव्यास आहे. मात्र ,  मात्र, ला°कडाऊन कालावधीत गावाचा अश्रय घेणारा संशयीत गन्हेगारी कारवाया करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिस जमादार शिवाजी सोनटक्के यांच्या फिर्यादीवरुन बर्दापुर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीताच्या अटकेनंतर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत विविध कलमांची नोंद करण्यात आली आहे.

पाच दिवसाची पोलिस कस्टडी : बर्दापुर घटनेतील संशयीतास पोलिसांनी दि.31 शनिवारी आंबाजागाई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने दि.4 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कस्टडीची शिक्षा सुनावली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here