Home क्राइम आरोपी रुग्णालयातून पळाला…!

आरोपी रुग्णालयातून पळाला…!

470
0

मराठवाडा साथी न्यूज
सांगली:
चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या चोरट्याला करोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या चोरट्याने सोमवारी पहाटे रुग्णालयाच्या बाथरुममधून पळ काढला. केरामसिंह रमेश मेहाड (वय २०, रा. मध्यप्रदेश) असे पळालेल्या चोरट्याचे नाव आहे. करोनाबाधित चोरट्याने रुग्णालयातून पळ काढल्याने आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांची तारांबळ उडाली असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरामसिंह मेहाड याच्यासह चौघांच्या टोळीला चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने २४ डिसेंबरला कुपवाड रोड येथून अटक केली होती. उत्तर प्रदेशातील या टोळीने सांगलीसह सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली होती. चौकशीदरम्यान प्रकृती खालावल्याने टोळीतील केरामसिंह याला पोलिसांनी उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. करोना चाचणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here