Home इतर अकाउंट केले कायमचे सस्पेंड…!

अकाउंट केले कायमचे सस्पेंड…!

215
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी काही दिवसांपूर्वी कॅपिटल भवनवर हल्ला केला. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांकरीता ब्लॉक केले होते.फक्त एव्हढेच नाही तर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते.मात्र,आता अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये, यासाठी ट्रम्प यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट कायमचे बंद करण्यात आले आहे.

दरम्यान,ट्विटरने स्पष्ट केले आहे की,हिंसाचाराला उद्युक्त करण्याच्या जोखमीमुळे आम्ही त्याचे अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटर नियमांचं उल्लंघन केल्याने हे पाऊल उचलल्याचेही ट्विटर कडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here