Marathwada Sathi

बालसुधारगृहातून अत्याचारीत मुलगी बेपत्ता

बीड : बीड शहरामध्ये राहणार्‍या एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरील आरोपी फरार होता. पीडित मुलीस अंबाजोगाईच्या बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणावरून रात्री मुलगी बेपत्ता झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन आठवड्यापूर्वी बीड शहरातील एका १७ वर्षीय पारधी समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला होता. सदरील हा अत्याचार गेवराई येथील मनोज धोत्रे नामक नराधमाने केला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मुलीचे वय कमी असल्यामुळे तिला अंबाजोगाईच्या बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले होते. रात्री या ठिकाणावरून सदरील मुलगी बेपत्ता झाल्याचे समोर आले.

Exit mobile version