Home मुंबई आता ‘आधार कार्ड’ आवश्यक नाही…!

आता ‘आधार कार्ड’ आवश्यक नाही…!

602
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : रजिस्ट्रार ऑफ जनरल इंडिया(आरजीआय)ने दिलेल्या माहितीनुसारआता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार क्रमांकाची आवश्यकता नसणार आहे.बऱ्याच लोकांकडून अगोदरच्या प्रक्रियेसाठी आक्षेप घेण्यात येत होता.त्यामुळे आता आधार क्रमांकाच्या शिवाय देखील जन्म आणि मृत्यूची नोंदणी केली जाऊ शकते.

देशभरात कोठेही कुणाचा जन्म किंवा मृत्यू झाल्यास,त्याची नोंद जन्म-मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक असते.जन्म किंवा मृत्यूच्या २१ दिवसाच्या आत कुटुंबातील कोणत्याही सदस्याला याची नोंदणी करता येऊ शकते.जरी घटना किती ही जुनी असो जन्म-मृत्यूच्या नोंदणी अधिनियम १९६९ च्या ९(३) नुसार नोंद केली जाऊ शकते.

वेग वेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेबसाइट्स वर ही प्रक्रिया ऑनलाईन केली जात आहे, परंतु मुळात नियम सर्वत्र एकसारखेच आहे आणि आता या साठी आधार कार्ड बनविण्याची देखील आवश्यकता नाही.फक्त एवढेच नाही तर आरजीआय ने दिलेल्या माहितीच्या प्रत्युत्तरात आरटीआय परिपत्रक जारी केले आहे.परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ‘कोणत्याही परिस्थितीत आधार क्रमांक डेटाबेस मध्ये संग्रहित केले जाणार नाही, तसेच कोणत्याही दस्तएवजेवर प्रिंट केला जाणार नाही.आवश्यक असल्यास आधार क्रमांकाचे पहिले चार अंकच प्रिंट केले जाऊ शकतात.

दरम्यान,या संदर्भात अधिक माहिती करीता आपण सीएससी(कॉमन सर्विह्स सेंटर -जनसुविधा केंद्र)शी संपर्क साधू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here