Home क्राइम एका फॅशन डिझाइनर तरुणीचा …

एका फॅशन डिझाइनर तरुणीचा …

81
0


मराठवाडा साथी

मुंबई : सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर उधारीवर घेतलेले पैसे परत करण्यासाठी घरी आला असताना चार्टर्ड अकाऊंटंटने बळजबरीने बलात्कार केला आणि त्यानंतर विवाह करण्याच्या बहाण्याने लैंगिक छळवणूक केली, असा आरोप एका फॅशन डिझाइनर तरुणीने केला आहे. तिच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी कुर्लामधील गोवालिया कंपाउंडमध्ये राहणाऱ्या फुरकन खान याच्या विरोधात एफआयआर दाखल केला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.


२०१९ जानेवारीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सीए असलेल्या फुरकनसोबत ओळख झाली. फेब्रुवारी-२०१९मध्ये त्याने वैयक्तिक अडचण सांगून माझ्याकडे दहा हजार रुपये उधारीवर मागितले. मी माझ्या मैत्रिणीकडून घेऊन त्याला पैसे दिले. पैसे करण्यास मात्र तो टाळाटाळ करू लागला. नंतर सप्टेंबर-२०१९ मध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने घरी आला. माझ्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. मी घरी एकटी असल्याचा फायदा घेत त्याने माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतरही विवाह करण्याच्या बहाण्याने त्याने छळवणूक सुरू ठेवली’, असे तरुणीने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here