Marathwada Sathi

शहरात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर चोरांचा धुमाकूळ ; घरे दुकाने फोडून दागिन्यांसह रोकड लांबवली

औरंगाबाद : रक्षाबंधनासाठी कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या शहरवासियांची घरे फोडून चोरांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. एकाच रात्री चोरांनी डाव साधून तीन घरे फोडून दुकाना देखील फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटना वाळुज औद्योगिक वसाहतीतील सिडको महानगर, गारखेडा परिसर आणि सिडको, एन-४ भागात घडल्या. विशेष म्हणजे पोलिसांचे नाईट राऊंड आणि बिट पुस्तिका गायब असल्यामुळे चोरीच्या गुन्ह््यात वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनांमुळे शहरवासियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये चोरीच्या गुन्ह््यात वाढ होताना दिसते. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पहाटे कुरिअरचे कार्यालय फोडून चोरांनी तिजोरी लांबवली होती. मात्र, तिजोरी उघडता न आल्यामुळे सुदैवाने त्यातील लाखो रुपयांची रोकड बचावली होती. हा प्रकार घडत नाही. तेच रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत चोरांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. वाळुज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अभियंता असलेले कृष्णा मोहनराव सोळंके (४०, रा. सिडको, महानगर-१, तापडिया फ्लोरा सेंटर) हे कुटुंबासह रक्षाबंधन सणानिमित्त चार दिवसांपुर्वी बीड जिल्ह््यातील माजलगाव येथे गेले होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सोळंके यांच्या घराची भिंत फोडत असल्याचा आवाज शेजा-यांच्या कानी पडला. त्यामुळे शेजारी करण सारडा यांनी तात्काळ सोळंके यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ही माहिती मिळताच सोळंके यांनी सोसायटीतील तेजस बडे, नानासाहेब बडे आणि गणेश शिरकले यांना घराची पाही करण्याचे सांगितले. हे तिघेही सोसायटीत झाले. तेव्हा त्यांना चॅनेल गेट उघडलेले तर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी आरडाओरड सुरु केली. यादरम्यान चोरांनी भितीपोटी पळ काढला.
…….
पाच तोळ्याचे दागिने, रोख, दुचाकी लांबवल्या……
सोळंके हे बुधवारी पहाटे घरी परतले. तेव्ह घराच्या पाठीमागील दरवाजा तुटलेला दिसून आला. तेव्हा पाठीमागील चॅनेल गेट उघडत नसल्यामुळे चोरांनी छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. चोरांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत कपाटातील दोन तोळ्याची सोनसाखळी, १३ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, चार ग्रॅमची कर्णफुले, लहान मुलाांचया पाच ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या आणि ५० हजारांची रोकड असा ऐवज लांबवला. याशिवाय अश्विन महाजन यांचे घर फोडले. मात्र, त्यांच्या घरात काहीही हाती लागले नाही. तर प्रकाश चिमनराव लव्हाळे, तेजस बडे आणि बुधाराम पिंडेल यांच्या दुचाकी लांबविल्याचेही समोर आले.
……….
गारखेडा परिसरात चोरांचे आव्हान
गारखेडा परिसरात चोरांनी पोलिसांना आव्हान देत दोन दुकाना आणि दोन घरे फोडली. संध्या दौलत जाधव (४२, रा. पारिजातनगर, एन-४) यांचे परिसरात कांचन ब्युटी पार्लर आहे. त्यांचे पती प्लॉटींगचा व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास संध्या व त्यांचे पती रक्षाबंधनासाठी नाशिक जिल्ह््यातील चांदवड तालुक्यात असलेल्या मंगरुळ येथे गेले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना घरमालक सुदीपसिंह सहदेव चौरे यांनी मोबाइलवर संपर्क साधून ब्युटी पार्लरचे कुलुप तुटलेले दिसत असल्याचे सांगितले. त्यामुळे संध्या या पतीसह बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरात दाखल झाल्या. त्यावेळी ब्युटी पार्लर व ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे कुलुप तुटल्याचे दिसून आले. तसेच पार्लरमधील टेबलच्या ड्रॉवरमधून दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, सहा गॅ्रमचे सोन्याचे झुंबर, सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच गॅ्रमपेंडल, तीन भाराचे चांदीचे कडे, हळद-कुंकवाचा करंडा आणि ७० हजारांची रोकड चोरीला गेल्याचे समोर आले. तसेच परिसरातील अजिंक्य पारसवाणी यांचे तिरुपती मेडीकल फोडण्याचा देखील प्रयत्न केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version