Marathwada Sathi

ए.आर. रहमान यांच्या आईचे निधन


संगीतातील श्रेय दिले आईला -निधनाने भावुक झाला रहमान

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर रहमान यांच्या आईचं चेन्नईमध्ये निधन झाले . करीमा बेगम असं त्यांच्या आईचं नाव होतं. स्वत: ए आर रहमान यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. करीमा यांना वयानुसार तब्येतीच्या काही तक्रारी सुरू झाल्या होत्या. गेले अनेक दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्यावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

‘मी 9 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हा माझी आई माझ्या वडिलांची वाद्य भाड्याने देऊन आमचं पालन पोषण करत असे. काही काळानंतर तिला वडिलांची वाद्य विकावीही लागली होती.’ मलादेखील संगीत क्षेत्रात पुढे जाण्याचं पाठबळ माझ्या आईकडूनच मिळालं होतं.असे सांगत रहमान यांनी संगीत क्षेत्रातील यशाचे श्रेय आईला दिले.करीमा बेगम यांचे पती आर के शेखरस्वत: एक उत्तम संगीतकार होते. त्यांनी एकूण 52 चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून काम केलं.

Exit mobile version