Home राजकीय सैादी नोटेवर भारताच्या नकाशात गडबड

सैादी नोटेवर भारताच्या नकाशात गडबड

11
0

नवी दिल्ली: श्रीवास्तव यांनी सांगितले की, “भारताने हा मुद्दा डिप्लोमॅटिक स्तरावर उचलला आहे.”  सौदी अरबने त्यांच्या अधिकृत नोटेवर काश्मीरबाबत चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल गुरुवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे सांगून तो तातडीने बदलण्यात यावा, असा भारताने सौदी अरबला संदेश पाठवला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही याबाबत आमची चिंता नवी दिल्लीतील सौदीच्या राजदूताना कळवली असून सौदी अरबमध्येही या दोन देशांदरम्यान राजनीतिक स्तरावर याबाबत चर्चा झाली आहे. सौदीने त्यांच्या अधिकृत नोटेवर जगाच्या नकाशाचे चित्र छापताना भारताच्या सीमांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली आहे आणि भारताने सौदीला याबाबत आपला निषेध कळवला असून ही चूक दुरुस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असेही सांगितले आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीर तसेच लेह हा भारताचा एकात्मिक भाग आहे अशी भारताची भूमिका आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here