Home बीड बीडपासून अवघ्या दहा किलोमीटरवर बिबट्याचा वावर!

बीडपासून अवघ्या दहा किलोमीटरवर बिबट्याचा वावर!

पारगाव (शिरस) मध्ये हरणाचा पडला पडश्या तर एक बोकुड नेले पळून

187
0

बीड : बीड शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पारगाव (शिरस) परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले असून पारगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरच एका हरणाची शिकार करण्यात आली असून ठोंबरे नामक एका शेतकऱ्याचे बोकुड बिबट्याने पळवून नेल्याची माहिती समोर येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सध्या आष्टी, शिरूर पाटोदासह गेवराई परिसरात बिबट्याने दहशत पसरली असून जिल्ह्यातील सर्वच शेतकरी बिबट्याच्या भीतीने भयभीत झालेले आहेत. शेतीतील कामे सोडून शेतकरी स्वतःच्या घरामध्ये बसले असून रात्रीच्या वेळी घरातून बाहेर निघण्याची हिम्मत देखील कोणी करत नाही. जिल्ह्याच्या आष्टी, शिरूर, पाटोदा, गेवराई तालुक्याच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी वन विभागाने तगडा बंदोबस्त बिबट्याला पकडण्यासाठी लावलेला आहे. मात्र आज बिबट्याने बीड तालुक्यामध्ये देखील प्रवेश केला असून बीड शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पारगाव शिरस गावाच्या परिसरात रस्त्याच्या काही अंतरावरच बिबट्याने एका हरणाची शिकार केली असून ग्रामस्थ त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा मोकाट कुत्रे हरणाचे मांस खात असल्याचे दिसून आले. तर तर परिसरातील ठोंबरे नामक एका शेतकऱ्याच्या बोकडाला पळवून नेऊन त्याची शिकार केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. यामुळे बीड तालुक्यातही बिबट्याच्या दहशतीचे प्रमाण वाढले असून काही अफवा काही सत्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here