Home मराठवाडा परळीत टायरच्या दुकानाला भिषण आग

परळीत टायरच्या दुकानाला भिषण आग

2066
0

परळी शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या प्रतीक टायर्स या दुकानाला आग लागली. सकाळच्या सुमारास लागलेल्या या आगीत मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. परळी नगर परिषद आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
जिल्हा परिषद सदस्य पती प्रा.मधुकर आघाव यांचे प्रतीक टायर्स हे दुकान वैद्यनाथ मंदिर मुख्य रस्त्यावर आहे. या दुकानाला सकाळच्या सुमारास आग लागली. अद्याप आग विझवण्याचे काम चालू असल्याने आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. नगरसेवक चंदूलाल बियाणी, स्वच्छता सभापती अन्वर मिस्किन, जेष्ठ नेते सुरेश टाक हे घटनास्थळी असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here