Marathwada Sathi

ह्रता दुर्गुळेच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज; अभिनेत्रीच्या नव्या फिल्मचा तुम्ही देखील होऊ शकता भाग

मुंबई: अभिनेत्री ह्रता दुर्गुळेसोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्रता चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ह्रता लवकरच एक नवीन मराठी सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमाच्या प्रक्रियेत एक चाहता म्हणून तुम्हाला योगदान देता येणार आहे. म्हणजेच या सिनेमाचं अनाउंसमेंट करण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ह्रता दुर्गुळेने नुकतीच तिच्या या नवीन सिनेमाबद्दल माहिती देणारी पोस्ट केली आहे. शिवाय यामध्ये कसं सहभागी व्हायचं याची देखील माहिती दिली आहे.
ह्रातनं एक पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, हाय फ्रेंडस!! माझा एक मराठी सिनेमा लवकरच येतोय, आणि त्या संदर्भात तुम्हा सगळ्यांना एक धमाल सरप्राईज द्यायचंय..! त्या सिनेमाचं नाव, रिलीज डेट तुम्हाला पर्सनलमध्ये सांगायचंय…!माझ्या या नव्या फिल्मची announcement मी नाही तर मायबाप प्रेक्षकांनी म्हणजे तुम्ही करावी अशी आमच्या संपूर्ण टीमची इच्छा आहे. तुम्हाला टीझर हवा असल्यास मला खालील आयडीवर ताबडतोब इमेल करा..असं म्हणत तिनं मेल आय़डी शेअर केला आहे.शिवाय ह्रतानं म्हटलं आहे की, माझ्य़ा नवीन सिनेमाच टीझर तुम्हाला लान्च करता येणार. ह्रताच्या या नवीन सिनेमासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. चाहत्यांनी यासाठी उत्सुक असल्याचे सांगितलं आहे. शिवाय तिला नवीन सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ह्रताच्या या नवीन प्रमोशनल फंड्याच्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे. शिवाय अनेकांनी मेल केल्याचे कमेंटमध्ये सांगून देखील टाकलं आहे. यावरूनच ह्रताची सोशल मीडियावरील लोकप्रियता लक्षात येते.हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. हृता दुर्गुळे हिने ‘फुलपाखरू’ या मालिकेत वैदेही हे पात्र साकारलं. या पात्राने तिला महाराष्ट्रातल्या घरा-घरात पोहोचवलं.इन्स्टाग्रामवर ह्रताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर 25 लाख फॉलोअर्स असलेली ह्रता ही एकमेव मराठी अभिनेत्री आहे असं म्हटलं जातं. हृता दुर्गुळेच्या कामाबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. हृताने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती फुलपाखरु या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. हृताने अनन्या आणि टाइमपास 3 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. मोठ्या पडद्यावर देखील ह्रताच्या अभिनयाचे कौतुक झालं.

https://www.instagram.com/p/CpPFwanIyBy/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version